तुळजापूर तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल95.72टक्के लागला असुन यात मुलीनीच बाजी मारली आहे. तुळजापूर तालुक्यातील 3759 विध्यार्थांनी परिक्षाफाँर्म भरला होता. त्यात मुले 1990, मुली 1759 यात प्रत्यक्षात मुले 1935, मुली 1738 असे एकुण3676 विध्यार्थी परिक्षेस बसले होते. यात मुले 1875 (93.79%) तर मुली 1701(97.87%)असे एकुण 3516 विध्यार्थी पास होवुन तुळजापूर तालुक्याचा निकाल 93.79 टक्के लागला. उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थीनीनी पास होताच देविस पेढे दाखवुन ते नातेवाईकांना वाटून आनंद साजरा केला.
तुळजापूर तालुक्यात एकुण 63 शाळा असुन, यात शासकीय 13, खाजगी 50 शाळा आहेत. अक्षरा धनंजय देशमुख तुळजामाता हिने दहावी परिक्षेत 91 टक्के मार्क घेवून उर्तीण झाली.