उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या मान्यवरांना शांतिदूत परिवार महाराष्ट्रच्या वतीने  सेवारत्न पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते सोमवारी (ता.२८) रोजी शहरातील ओम लॉन्स येथे विवीध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळ संपन्न होणार आहे. 

सेवारत्न पुरस्कार २०२५ साठी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहियोदिन सुलतान, माजी नगरसेवक विजय दळगडे, महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे सह संचालक डॉ.तुकाराम मोटे,जकेकुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी, उद्योजक अनिल सगर,  सुमित कोथिंबीरे, पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले,  मंजुषा चव्हाण, अॅड. दिलीप सगर, एसबीआय शाखा प्रबंधक शितल रासकर, अपर्णा पोद्दार, संजय रूपाजी, सुरेश माणिकवार, अशोक जाधव, किसन राठोड, अजय गायकवाड,  शेखर आंबेकर, गोविंदराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा ओम लॉन्स चौरस्ता येथे संपन्न होणार असून तालुका व परिसरात नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विट्ठलराव जाधव, प्रा. युसुफ मुल्ला, प्रा. जिवन जाधव, मनेश माणिकवार, पद्माकर मोरे यांनी केले आहे.

 
Top