तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थी सौरभ किरण आबदारे याने मानाची समजली जाणारी महाराष्ट्रातील नामवंत इंग्रजी विषयाची स्पर्धा “वर्ड पॉवर चॅम्पियनशिप“ मध्ये फायनल मध्ये स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्रातील 'लिप फॉर वर्ड' या  संस्थेद्वारे महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये वर्ड पॉवर चॅम्पियनशिप  ही स्पर्धा घेतली जाते.या स्पर्धेमध्ये इंग्रजी विषयावर आधारित इंग्रजी व्याकरण, मराठीमध्ये इंग्रजी वाक्याचे भाषांतर, मराठी वाक्याचे इंग्रजी मध्ये भाषांतर अशा कठीण पातळीवर महाराष्ट्र मधून 5,000 विद्यार्थ्यांमधून शेवटी फायनल साठी फक्त 6 विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  क्वार्टर व सेमी फायनल परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे समोरासमोर विद्यार्थ्याला प्रश्न विचारून ही परीक्षा घेतली जाते. या स्पर्धेची फायनल मुंबई या ठिकाणी होते.या अतिउच्च कठीण पातळीवर असणाऱ्या स्पर्धेमधून महाराष्ट्र संत विद्यालयाच्या विद्यार्थी सौरभ किरण आबदारे यांची निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सौरभ आबदारे याला परीक्षेसाठी त्याचे वर्गशिक्षक व इंग्रजी विषय शिक्षक एस.यू. गोडगे यांचे मार्गदर्शन मिळाले.या मिळालेल्या यशाबद्दल  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिनगारे टी. पी., उपाध्यक्ष अविनाश पाडुळे,  मुख्याध्यापक जे.के. बेदरे, पर्यवेक्षक एस.एस. पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांनी  अभिनंदन केले.

 
Top