धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच या संस्थेद्वारे दरवर्षी दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असते व त्यात नामांकित व्यक्तींच्या व्याख्यानासोबत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. या वर्षीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक युवराज नळे यांच्या सामाजिक साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा विचार करून मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा व जेष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांच्या शुभहस्ते व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा रवी सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. कुठल्याही अपेक्षेशिवाय करत राहिलेल्या कार्याची समाज योग्य वेळी योग्य ठिकाणी अवश्य दखल घेत असतो त्याचाच भाग म्हणजे आपल्या कार्याचा होत असलेला हा सत्कार आहे, ज्यामुळे अधिक जोमाने व जबाबदारीने काम करण्याची इच्छा प्रबळ होते अशी भावना युवराज नळे यांनी व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.


 
Top