धाराशिव (प्रतिनिधी)-आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. आज रोजी बाजार खरेदी विकी संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवडी झाल्या. सर्वानुमते संघाच्या चेअरमनपदी उद्धवराव पाटील वरुडा तर व्हाइस चेअरमनपदी ॲड.रामेश्वर शेटे, कोंड यांची निवड झाली. याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

नूतन चेअरमन पाटील व व्हा.चेअरमन ॲड.शेटे यांचा भाजपा कार्यालय, धाराशिव येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी जि.प.अध्यक्षतथा भाजपा जिल्हा संयोजक नेताजी पाटील, संतोष बोबडे, बालाजी गावडे, नाना कदम, नीलकंठ पाटील, पांडुरंग पवार, नूतन संचालक आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top