कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथे संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या मूल्यांच्या आधारित गायरान अतिक्रमण धारक जनसंसद व मराठवाडा स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 8 मार्च महिला हक्क दिनानिमित्त व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर मोर्चाच्या आयोजना निमित्त ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

या बैठकीमध्ये हवामान बदलाचे होणारे परिणाम, निवासी अतिक्रमणे नावे करा, गायरान जमीन अतिक्रमण नावे करा आदी विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे . सदरील बैठक पंचायत समिती कार्यालय कळंब येथील  सभागृहात दि.8 मार्च 2025 रोजी सकाळी 12 ते 02 या वेळेत होणार असुन या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पाराव मोरताटे (संस्थापक अध्यक्ष) गायरान मोर्चा परभणी, नागनाथ चव्हाण (संस्थापक अध्यक्ष) वंचित हक्क आंदोलन,अशोक पालके (संस्थापक अध्यक्ष) युवा आंदोलन संघटना आंबेजोगाई, राजेश घोडे (संस्थापक अध्यक्ष) आझाद क्रांती सेना, धम्मपाल कांडेकर (संस्थापक अध्यक्ष) युवा प्रदेशाध्यक्ष पँथर्स रिपब्लिकन पार्टी बीड, विश्वनाथ गवारे जमीन अधिकार आंदोलन परभणी,बायजाबाई घोडे जमीन अधिकार आंदोलन परभणी, जगदीश कुमार इंगळे विदर्भ बिगर सातबारा संघटना, संदिपान जोगदंड दलित हक्क आंदोलन, रामभाऊ लगाडे जिल्हाध्यक्ष जानिव संघटना, राम शेंडगे (संस्थापक अध्यक्ष)बहुजन अधिकार आंदोलन, श्रावण क्षीरसागर (ज्येष्ठ साहित्यिक)वाशी तालुका आदी उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रमाचे आयोजन भाई बजरंग भाऊ ताटे (संस्थापक अध्यक्ष) श्रमिक मानवाधिकार संघ व सचिव माया शिंदे यांनी केले आहे. तरी मराठवाड्यातील व धाराशिव जिल्ह्यातील गायरान धारकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top