तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे 3 मार्चच्या रात्री साडेबाराच्या सुमारास पत्र्याच्या शेडमधून शेळ्या, बोकड चोरून घेऊन जाताना चोरट्यांनी डोक्यात दगड घालून तानाजी मुळे यांचा खून केल्याची घटना घडली.

याची पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे 3 मार्चच्या रात्री साडेबाराच्या सुमारास हिंगळजवाडी येथील विजय  मुळे यांच्या हिंगळजवाडी गावालगत असलेल्या गायरान शेत जमीनीत शेडचा पत्रा उचकटून शेडमध्ये प्रवेश करून शेडमध्ये बांधलेल्या दोन बोकड व दोन शेळ्या चोरून चोरटे घेऊन जात असताना शेड समोर झोपलेले  तानाजी भगवान मुळे वय 65 यांच्या डोक्यात चोरट्यांनी दगड मारून गंभीर जखमी करून ठार मारले.या प्रकरणी विजय मुळे यांच्या फिर्यादीवरून संजय राजेंद्र पवार,जितु उर्फ जितेंद्र प्रभू पवार रा.तेर, अमोल ईश्वर काळे, ईश्वर रामा काळे रा. हिंगळजवाडी यांच्या विरुद्ध ढोकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि विलास हजारे करीत आहेत. 


हिंगळजवाडी येथील तानाजी मुळे यांच्या खून प्रकरणी चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. सकाळी ही माहिती हिंगळजवाडी येथील नागरीकांना समजताच नागरीकानी कांहीं वेळ तेर-धाराशिव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. चोरट्यांनी पत्र्याच्या शेडजवळ कांही अंतरावर बोकड व शेळ्या चोरून नेताना एक शेळी मारून झाडावर फेकून दिल्याने ती झाडावर मृत अवस्थेत लोंबकळत होती.

 
Top