उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील हिंदू खाटिक समाज संघटना व अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड उमरगा तालुका यांच्या वतीने सत्यशोधक समाजाचे अग्रदूत, हिंदू खाटिक समाजभूषण डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या 184 व्या जयंती निमित्त क्रांती चौक येथे अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी सकाळी 10 वाजता डॉ. संतुजी लाड यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चालुक्य, हिंदू खाटिक समाज संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, उमरगा तालुका अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष गणेश घोडके, सचिव आदर्श कोथिंबरे, संतुजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण कांबळे, उपाध्यक्ष प्रशांत घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर श्री साईनाथ पिस्के यांचा 'महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार' मिळाल्याबद्दल हिंदू खाटिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रभाकर पिस्के, राजेंद्र कांबळे, देविदास बुये, युवराज घोडके, प्रकाश कांबळे, अमर कोथिंबरे, सुमित कोथिंबरे, प्रभाकर थोरात, अभि टोंपे, नागेश घोलप, बालाजी डोंगरे, बंटी बुये, धनराज कांबळे, किशन कांबळे, अजय कांबळे, सतीश कांबळे, कृष्णा कांबळे, रोहन कांबळे, महेश कांबळे, गणेश कांबळे, देव कांबळे आदी समाजबांधवांनी पुढाकार घेतला.