तुळजापुर (प्रतिनिधी)- सोयाबीन  ऑनलाईन नोंद झालेली सोयाबीन शासनाने  हमीभावात खरेदी करा व सोयाबीन  खरेदी मुदत वाढ देण्याचा मागणीसाठी शेतकरी  महाविकास आघार्डेीं स्वराज्य संघटना वतीने  बुधवार  दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी जुन्या बसस्टॅन्ड चौकात सोयाबीन भरलेल्या वाहनासकट रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संखेने शेतकरी, महाविकास आघाडी व स्वराज्य  संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील म्हणाले कि, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चार हजार नोंदणी झाल्या असुन,  700 शेतक-याचे सोयाबीन खरेदी केले आहे. शासनानेे घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करता शेतकऱ्यांचे सोयाबीन  खरेदी न केल्यास, मुदतवाढ न दिल्यास आम्ही  जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देवु असे यावेळी म्हणाले.

यावेळी आंदोलन महसुल अधिकारी वर्गाने निवेदन स्विकारले. यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, उत्तम  अमृतराव, शाम  पवार, बालाजी रोचकरी, राहुल खपले, कुमार टोले, मधुकर गंगणे, अण्णा क्षिरसागर सह विविध पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी मोठा संखेने सहभागी झाले होते.


 
Top