धाराशिव (प्रतिनिधी)- जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाडोळी (आ.) येथे संस्थेचे अध्यक्ष तथा रुपामाता समूहाचे प्रमुख अँड व्यंकटराव गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. 

अँड व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तद्पुर्वी ग्रामीण भागात उद्योग, कृषि, दुग्धव्यवसाय, बँकिंग, शैक्षणिक, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मुंबई येथे एबीपी माझा यांच्या तर्फे अनमोल रत्न तर नाशिक येथे रिसील डॉट इन व समाचार वाणी यांच्यातर्फे  “महाराष्ट्राचा अभिमान, उद्योगांचा सन्मान-महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2025” मिळाल्याबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाडोळी (आ.) येथील दोन्ही मुख्याध्यापक यांनी शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर गुंड माजी जि.प.उपाध्यक्ष, गणेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन, बेंबळी, पठाण सर पोलीस सब इन्स्पेक्टर बेंबळी, डॉ. गौरी झोरे वैद्यकीय अधिकारी पाडोळी (आ), डॉ. सुसेन गाजरे मेडिकल कॉलेज लातूर, बाबुराव पुजारी,सतीश एकंडे, भाऊसाहेब गुंड, धनंजय पाटील, बांगर साहेब उपस्थितीत होते. या कार्यक्रमासाठी पाडोळी व पाडोळी परिसरातील शिक्षक प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश पाटील यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, व शाळेतील विविध कार्यक्रम, उपक्रम, याबद्दल श्री गुंड साहेब यांचे कौतुक केले  या कार्यक्रमांमध्ये  अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या.

यावेळी रुपामाताचे प्राचार्य सुरेश मनसुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सुरवसे, शिक्षक अमोल गुंड, सचिन यादव, बापू शेख, नागनाथ गोरे,भीमराव जावळे, सुरेश सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, रामचंद्र राख, रवी पवार, सचिन सोनकटले, श्रीमती महानंदा गुंड, वैशाली माळी तसेच पालक, विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. प्राचार्य सुरेश मनसुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचलन बापू शेख सर यांनी केले.

 
Top