तुळजापूर (प्रतिनिधी)-लोकमंगल फाउंडेशन आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा धाराशिव येथे रविवार दि.20 एप्रिल  रोजी दुपारी 12 वा. 25 मिनिटांनी आयोजित केला आहे. हा विवाह सोहळा छायादीप मंगल कार्यालय, जिल्हा दूध संघासमोर, छत्रपती संभाजी नगर रोड,धाराशिव येथे होत आहे. यानिमित्त धाराशिव विधानसभा क्षेत्रातील लोकमंगल समूहातील पदाधिकाऱ्यांची बैठक फौंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे पार पडली. बैठकीत रोहन देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी आवाहन केले. यावेळी एक पदाधिकारी एक विवाह नोंदणी असा संकल्प करण्यात आला. प्रत्येकाने किमान एक जोडप्याला तरी या योजनेचा लाभ मिळवून देऊ असे सांगितले.

2006 पासून विवाह सोहळ्यास सुरवात झाली आहे. यंदाचे हे  20 वे वर्ष असून 44 वा विवाह सोहळा आहे.आजपर्यंत एकूण 3 हजार124 लग्न संपन्न झाले आहेत. जास्तीत इच्छुक जोडप्यांनी या विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करावी.नाव नोंदणी साठी  9923800256 येथे संपर्क करावा असे आवाहन लोकमंगल फौंडेशनतर्फे करण्यात आले आहे. यावेळी बैठकीला भारतीय जनता पार्टी तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व लोकमंगल परिवाराचे सदस्य मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते.

 
Top