भूम (प्रतिनिधी)- मित्रत्वात आपलं सर्वस्वी विसरून दुसऱ्या मित्राचे कौतुक करणं यालाच खरे मित्र म्हणतात. असाच एक अनोखा प्रसंग एकेकाळी विधान परिषदेमध्ये आमदार असणारे सुजितसिंह ठाकूर याच उत्कृष्ट भाषण विधान परिषदेमध्ये केले असल्याने  त्यांना नुकतेच राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी माजी राहुल मोटे यांनी भेट घेतली.

परांडा येथील माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांना विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार प्राप्त झाला. विशेष म्हणजे आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपती मुर्मु यांच्या शुभहस्त या पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. यानिमित्ताने परांडा येथील त्यांच्या संवाद निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.  तसेच आगामी काळात असेच भरभरून महाराष्ट्रात आपले कौतुक व्हावे अशा प्रकारची साद घातली. याप्रसंगी राहुल बनसोडे व मित्रपरिवार उपस्थित होता.

 
Top