परंडा (प्रतिनिधी) - येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयाचे कर्मचारी अनिल जानराव यांचा मुलगा आदित्य अनिल जानराव याने नागपूर येथे प्रातू एस पी आर झेड फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नागपूर  विद्यार्थी संस्थेमध्ये गुणवत्ते नुसार निवड करण्यात आली होती. 

या फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आदित्य अनिल जानराव यास केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  उत्कृष्ट नेतृत्व आणि वक्तृत्व कौशल्य दाखवल्याबद्दल  त्यास सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तो सध्या नागपूर येथे गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्गात  वर्षात शिकत आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव,उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे व महेश पडवळ, फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख, डॉ प्रकाश सरवदे, आजोबा विनायक जानराव, ज्येष्ठ समाजसेवक तानाजी शिंदे यांच्यासह परंडा तालुक्यातील व माढा तालुक्यातील अनेक मित्र परिवारांनी अभिनंदन करत कौतुक केले.

 
Top