कळंब (प्रतिनिधी)-मॉडेल इंग्लिश स्कुल, कळंब मध्ये आषाढी एकादशी निमित्त आषाढी वारीचे नियोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील विध्यार्थी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, एकनाथ,नामदेव, मुक्ताबाई, जनाबाई, वारकरी, निवृत्तीनाथ, इत्यादी संतांच्या वेशभूषेत आले होते. तर काहींनी पांडुरंग -रुक्मिणी यांच्या वेशभूषेत येऊन सर्व कळंब वासियांना भक्ती रसात नाहण्याचा आनंद दिला.
वारकरी “निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम“ आदी संतांचा जयघोष करत शाळेपासून शहरातील मुख्य चौकातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भगवंत मंदिर या ठिकाणी पालखीतील वारकरी स्थिरावले. यावेळी कळंब शहराचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले बिरदीचंद बलाई यांनी पालखीचे दर्शन घेतले व आशीर्वाद दिला. तसेच कळंब शहराचे अन्नदाता बंडोपन्त दशरथ तसेच पंडित दशरथ यांनी देखील पालखीचे दर्शन घेत चिमुकल्या वारकरी संतांच्या दिंडीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे चेअरमन करसण पटेल यांनी संपूर्ण वारीतील वारकऱ्यांसाठी नाश्ता व चहा पाणीची सोय केली. स्वतः देखील वारीत, भक्ती मय वातावरणात भिजण्याचा आनंद घेतला. वारीतील जयघोषामुळे संपूर्ण कळंब वासियांत भक्तिमय वातावरण निर्माण झालेले चित्र दिसून आले. आषाढी वारी भक्तिमय व उत्साहात संपन्न होण्यासाठी प्राचार्या, शिक्षक, पालक, विध्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मेहनत घेऊन संपन्न केली.