परंडा (प्रतिनिधी)-मंडई भीम नगर येथील हमाल माथाडी कामगार हर्षवर्धन बनसोडे यांच्या मातोश्री उषा गजेंद्र बनसोडे यांचा मागील आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अपघात झाला. त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी  दाखल करण्यात आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहुल मोटे यांच्या सूचनेवरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तातडीच्या आर्थिक मदतीचा धनादेश राहते घरी नातेवाईकांच्या हातात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, उपसभापती संजय पवार, संचालक एड.सुजित देवकते, संचालक शंकर जाधव, संस्थेचे सचिव सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, घनश्याम शिंदे,जीवन बनसोडे, रणजीत शिंदे,विजय चौतमहाल, अजय चौतमहाल, सुजाताबाई बनसोडे, बेबीताई चौतमहाल, कामीना बाई बनसोडे  यांच्या सह महिला व समाज बांधव उपस्थित होते.


 
Top