धाराशिव (प्रतिनिधी)-हा जिल्हा अंकाक्षित जिल्हा म्हणून महाराष्ट्र ओळखतो. जिल्ह्यात नवीन उद्योग आणणे म्हत्वाचे होते. खासदार यांनी निवडून आल्यानंतर व महाराष्ट्रात त्यांची सत्ता असताना देखील जिल्ह्यात काय उद्योग आणले. कोणती ठळक विकास कामे केली. यांची माहिती द्यावी असे आवाहन रूपामाता उद्योग समुहाचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड यांनी पत्रकार परिषदेत केले.

बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी, विश्व हिंदू परिषदेचे बाबूराव पुजारी यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड. व्यंकट गुंड यांनी आपण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुिक उमेदवार आहे. या संदर्भात पक्ष श्रेष्ठींची भेट घेणार आहे. 1978 पासून सलग 25 वर्षे पाडोळी गावचे सरपंचपद आपल्याच घरात होते. गुंड घराणे म्हणजे भाजपचे निष्ठावंत घराणे म्हणून ओळख आहे. धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणी रूपामाता उद्योग समुहाच्यावतीने साखर कारखाने काढले आहेत. जिल्ह्यातील सहकार बुडाला असताना आपण सहकारच्या माध्यमातून कारखाने, बँक, दुधसंघ सुरू करून शेतकऱ्यांना व लोकांना सेवा उपलब्ध करून दिली आहे. दुष्काळात लोक पुण्या-मुंबईला जावू नये म्हणून कारखान्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. शिक्षण संस्था, वेअरहाऊसाच्या माध्यमातून या भागातील लोकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


बहुजनातील उमेदवार

भाजपाने केलेल्या सर्वेमध्ये धाराशिवची जागा भाजपाचा उमेदवार असेल तरच जिंकू शकेल असा अहवाल आला आहे. असे सांगून ॲड. व्यंकट गुंड यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघात बहुजनांतील उमेदवार असेल असेही सांगितले. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आपल्याकडे व्हिजन असून, आपल्याला संधी मिळाल्यास आपण औद्योगिकीकरणाला जिल्ह्यात प्राधान्य देवून जिल्ह्याचा विकास करू असे ॲड. गुंड यांनी सांगितले. 


 
Top