धाराशिव (प्रतिनिधी)-देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मा.राहुल गांधी यांनी 14 जानेवारी रोजी मणिपूर मधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा मणिपूरमधून नागालँड, अरुणाचल प्रदेशमधील प्रवास पूर्ण करून आसाम मध्ये दाखल झाली आहे. यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून देशातले सर्वात भ्रष्ट आसामचे मुख्यमंत्री बिथरले असून त्यांनी आपल्या गुंडामार्फत यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्यांच्या गुंडांनी भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला केला. राहुल गांधी यांची बस अडवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यात्रा मार्गात सतत अडथळे आणले जात आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा आवाज दडपू पाहणा-या भाजपाविरोधात आज धाराशिव येथे काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र “निदर्शने“ करण्यात आली.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, वरीष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, जि.प.गटनेते प्रकाश आष्टे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, दीपक मुळे, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव शिलाताई उंबरे, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, अमोल कुतवळ, अनंत घोगरे, मिलिंद गोवर्धन, अब्दुल लतीफ, अंकुश पेठे, रवी ओझा, युवक काँग्रेसचे भैय्या निरफळ, अध्यक्ष कफिल सय्यद, महादेव पेठे, धवलसिंह लावंड, सुनील बडूरकर, संतोष पेठे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.