धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव जरी झाले असले तरी लोकसभा, विधानसभा व विधान परिषद मतदार संघातील नाव हे उस्मानाबाद असेच असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासोबत राज्य निवडणूक आयोगाने पत्र व्यवहार केल्यानंतर निवडणुकीत उस्मानाबाद हेच नाव असणार आहे.

परिमिसन आयोगाच्या नियमानुसार 2026 नंतर जनगणना होणार असून, त्यानंतर मतदार संघ नाव पुर्नरचना होणार आहे. त्यामुळे 2026 पूर्वी मतदार संघाचे नाव जैसे थेच राहणार आहे. या नियमामुळे उस्मानाबादचे नाव धाराशिव झाले असेल तरी निवडणुकीत मात्र उस्मानाबाद असेच म्हणावे लागेल. हाच नियम औरंगाबाद, संभाजीनगरसाठी लागू असणार आहे. 15 सप्टेंबर 2023 च्या आदेशानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे व विभागाचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव असे करण्यात आले होते. परिसीमन कायद्याच्या तरतुदीनुसार लोकसभा व विधानसभा मतदार संघाचे नाव बदलण्यासाठीचा प्रस्ताव 28 नोव्हेंबर 2023 रोजी भारत निवडणूक आयोगाकडे पाठवला होतो. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार राज्यामध्ये प्रशासकीय भाग तयार करणे, त्यामध्ये सुधारणा व नावामध्ये बदल करणे हे राज्य सरकारद्वारा आवश्यकतेनुसार वेळोवेळी करण्यात आलेली नियमित प्रक्रिया असते असे कळविले आहे. 

लोकसभा व विधानसभा मतदार संघाचे नाव व्याप्ती त्यावेळी स्थापित करण्यात आलेल्या परीसीमन आयोगाने निश्चित केलेली आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा व विधान परिषद मतदार संघाच्या नावामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे.


 
Top