तुळजापूर (प्रतिनिधी)- नगदी पिक म्हणून तालुक्यात कांदा कडे शेतकरी मोठ्या आशेने पहात असताना निर्यात बंदीने माञ कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांची पार निराशा केली आहे. आता  कोणते पिक घ्यावे म्हणजे त्यातुन कुंटुंब चालवता येईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केली आहे. 31 मार्चपर्यंत हा बंदी कायम असणार आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. कांद्याच्या निर्यातबंदीने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल रोष निर्माण झाला आहे. 

केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत असले तरी वस्तुस्थिती यामध्ये खुप मोठे अंतर आहे. शेतकरी मोठे कष्ट करुन आपल्या शेतामध्ये पिकाचे उत्पादन घेतो. एक पीक आणण्यासाठी साधारणपणे तीन-चार महिन्यांचा कालावधी घालवतो. ते पीक ज्यावेळी काढणीसाठी येते, त्यावेळी सरकार त्याच्या निर्यातीवर बंदी घालते. त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या त्या पिकाच्या दरावर होते. सरकारच्या एका  निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. मागील हंगामात सोयाबीनचे उत्पादन भरघोस निघाल्यानंतर त्याच्यावरही निर्यातबंदी सरकारने आणली. एवढेच नाही, तर तेल आयात करण्याचा निर्णयही घेतला. सरकारचा हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. ज्यावेळी शेतकऱ्याचे पीक बाजारात येते, त्यावेळी असे शेतकऱ्यांना मारक ठरतील असे निर्णय घेतले जातात असा आरोप शेतकऱ्यांन मधुन केला जात आहे. गरजवंत असलेला शेतकरी मिळेल त्या भावाने आपले पीक विकतो. ते पीक व्यापारी खरेदी करतात. त्याची साठवणूक करतात. काही कालावधीनंतर सरकार त्यावरील निर्यातबंदी मागे घेते. त्यानंतर त्या पिकाचा दर वाढतो. अशी पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत असल्याचे दिसून येते. सरकारच्या एखाद्या निर्णयाचा दूरगामी परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होतो.

तशीच स्थिती कांद्याच्या पिकाबाबत झाली आहे. देशात महाराष्ट्र प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. कांद्याच्या निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना  बसत आहे.कांद्याने शेतकरी व सरकारचा माञ वांदा केला आहे कांदाऊत्पादक शेतकरी शेतातील कांदा हंगाम संपल्यानंतर कांदा निर्यात बंदी मागे घेतली तर उपयोग काय असा सवाल कांदा ऊत्पादक शेतकरी करीत आहेत.


निर्यातबंदीमुळे कुंटुबाचे काबाडकष्ट वाया जातय - शितल गोरे, अपसिंगा    

मागील काही वर्षापासुन कांद्याला भाव मिळत नाही यंदा 35 ते 40रुपये  मिळत असताना निर्यातबंदी केल्याने कांद्यातुन पैसे तर सोडा कष्ट केलेल्या कामाचा घामाचा हि दाम निघत नाही, कांदा ऊत्पादकांना निर्यात बंदी उठवली तरच तो जगु  शेकतो. मागे पुढे काढणी करुन ही काद्यांला दर मिळत नाही. द्राक्ष व कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अर्थिक संकटात गेला आहे. शासनानेे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देवुन त्याला अर्थिक संकटातुन काढले तरच तो जगेल अन्यथा त्याला जगु वाटणार नाही.


 
Top