तुळजापूर (प्रतिनिधी)- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तुळजापूर यांच्या आदेशाप्रमाणे “कटारे स्पिनिंग मिल कमलानगर, तामलवाडी पतसंस्थाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये चेअरमनपदी शाहीर गायकवाड, व्हॉईस चेअरमनपदी मौला पटेल, सचिवपदी सतीश माळी तसेच सदस्य पदी मारुती रोकडे, विकास चौगुले, धनाजी गुंड, सुरेश डांगे, सौ रुक्मिणी क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून दत्तात्रय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव यांनी काम पाहिले. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण, अनिल क्षीरसागर यांनी सर्वाचे अभिनंदन केले.