तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर पासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कामठा येथे उत्पादन शुल्क विभागाने बुधवार दि. 20 डिसेंबर रोजी राञी टाकलेल्या धाडीत गोवा राज्य निर्मीतीचे विदेशी व बनावट (डुप्लीकेट) भेसळ मद्य मिळून आले. या धाडीत एकुण अंदाजे रू.10 लाख 94 हजार 530 रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
कामठा परिसर तिर्थक्षेञ तुळजापूर जवळ असुन येथे देशी विदेशी बनावट मध सापडल्याने येथे डुप्लीकेट मद्य विक्री चे रँकेट असण्याची शक्यता असुन येथील डुप्लीकेट मद्य साठा कुठे विकला जातो कोन दुकानदार घेतो व विकतो याची चौकशी करुन शाषणाचा महसुल बुडवणा-या व नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या या रँकेटच्या मुळाशी पोलिसांनी जावुन आरोपीचा मुसक्या आवळण्याचे काम करावे अशी मागणी होत आहे
नाताळ व नववर्षच्या पार्श्वभुमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तुळजापुर पी. ए. मुंळे यांनी दि. 20 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 नुसार कलम 65 (अ,ब,क,ड, फ, ई), 81,83, 90 व 108 अन्वये मौजे कामठा शिवार ता. तुळजापूर व अनुसुंर्डा ता. जि. धाराशिव या ठिकाणी सापळा रचुन छापा टाकुण गोवा राज्य निर्मीतीचे विदेशी व बनावट (डुप्लीकेट) भेसळ मद्य मिळुण आले. यावेळी आरोपी व्यंकटेश रामहरी माने वय 34 वर्षे रा. अनसुर्डा, ता जि धाराशिव, ऋषीकेश अरुण भोसले वय 21 वर्षे, रा. अनसुर्डा ता.जि.धाराशिव या आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर दोन फरार आरोपीना पकडण्यासाठी पथके रवानगी करण्यात आलेली आहेत.
हा आहे 10 लाख 94 हजार 530 मुद्देमाल
गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा ॲडरेल 750 मिली क्षमतेच्या 1308 बाटल्या किंमत 8 लाख 37 हजार 120, ओ चोईसच्या 750 मिली क्षमतेच्या 216 बाटल्यांची किंमत 23 हजार 760 रुपये, रॉयल क्लासीकच्या 750 मिली क्षमतेच्या 24 बाटल्याची किंमत 2 हजार 640 रुपये, ॲडरेल 180 मिली क्षमतेच्या 336 बाटल्या 53 हजार 760 रूपये. तसेच 25 -9274 बजाज कंपनीची दोन चाकी सीटी मोटारसायकल किंमत 1 लाख 10 हजार रूपये, हिरो कंपनीची दोन चाकी स्पेल्डर मोटारसायकल चेसी नंबर 1018323 किंमत 65 हजार 200 रुपये. विदेशी दारुचे बाटल्याचे बनावट 225 बुचे 2 हजार 250 रुपये असा एकुण 10 लाख 94 हजार 530 रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क धाराशिव अधीक्षक गणेश बारगजे, निरीक्षक पवन मुळे, निरीक्षक तानाजी कदम, शिवाजी कोरे, दुय्यम निरीक्षक पी. जी. कदम, आर. आर. गिरी, व्ही. ए. हजारे, राहुल चांदणे, देशमुखे, राजेंद्रसिंह ठाकुर, अविनाश गंवडी, अनिल सोनकांबळे व एजाज शेख यांचा सहभाग होता. सदर कारवाईचा तपास तुळजापूर राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पी. ए. मुळे, हे करीत आहेत.