उमरगा (प्रतिनिधी)-शहरातील आरोग्य नगरी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्न व नातेवाईसाठी उमरगा रोटरी क्लबच्या वतीने सोमवारी, दि 27 नोव्हेंबर रोजी मोफत अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. डॉ दिपक फोपळे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे प्रवेशद्वार तसेच सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्हयात उमरगा शहराची मेडकल हब म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शंभर खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर आहे. दोन मोठी आरोग्य नगरी आहे. यात बालरोग, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, स्री रोग, नेत्ररोग,दंतरोग, कान, नाक, घसा, अस्थिरोग, भूलतज्ज्ञ, सर्जन अशा शंभर पेक्षा अधिक खाजगी तज्ञ डॉक्टरांचे सुसज्ज असे 50 ते 60 खाजगी दवाखाने आहेत. त्यामुळे येथे दररोज अपघात, जळीत, विषबाधा, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आदीसह तीन ते चार हजार अबाल वृद्धासह महिला रुग्ण आरोग्य तपासणी व उपचारासाठी येतात. विशेषतः शेजारच्या कर्नाटक, आंध्र व तेलंगणा राज्यातील रूग्णाची संख्या अधिक आहे. रोटरी क्लब उमरगाच्या वतीने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णासाठी मोफत अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे रुग्न व नातेवाईकांनाही आधार मिळणार आहे. तर रुग्णाला आर्थिक भार कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच गोर गरीब कुटुंबांतील व्यक्तीनाही मोफत जेवण देण्यात येणार आहे. यावेळी दिपक पोफळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर भोसले. सचिव शिवकुमार दळवी, प्रदिप चालुक्य, प्रशांत कुलकर्णी, प्राचार्य शिवानंद दळगडे, डॉ राजकुमार कानडे, प्रा. संजय अस्वले, सतीश साळूंके, अनिल मदनसुरे आदीसह रुग्न व नातेवाईक उपस्थित होते.


रोटरी क्लबच्या वतीने सुरु करण्यात आलेली रुग्नासाठी मोफत अन्न पूर्णा योजना हे एक मानवतापूर्ण कृत्य आहे. रुग्ण हा आधीच आजारपणामुळे कमकुवत असतो. त्याच्या शरीराला निरोगी होण्यासाठी पुरेशी पोषक तत्त्वे मिळणे आवश्यक असते. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांसाठी मोफत जेवण देणे हे एक उपकार्य आहे. या उपकार्याने रुग्ण व नातेवाईकांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मदत होणार आहे.

- (कमलाकर भोसले, रोटरी क्लब अध्यक्ष उमरगा)


 
Top