धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, धाराशिव व खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विशेष सहकार्याने दि. 17/04/2023 ते 24/04/2023 या कालावधी मध्ये संपूर्ण मतदार संघात दिव्यांग बांधवाचे तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.  योजने अंतर्गत मोफत कृत्रीम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी संपुर्ण लोकसभा मतदार संघातील धाराशिव जिल्हयातील  परंडा येथे परंडा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये एकुण 268 पात्र दिव्यांगना तसेच सोलापूर जिल्हयातील बार्शी येथील सुलाखे हायस्कुल प्रांगणामध्ये 350 पात्र दिव्यांगना, विविध कृत्रिम अवयव व साहित्य वाटप खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते  पात्र लाभार्थ्यांना सायकल, व्हील चेअर, कुबडीजोडी, श्रवणयंत्र, सी. पी. चेअर, अंधकाटी, स्मार्ट फोन,स्टीक, आदी साहित्य गरजु व पात्र लाभर्थ्यांना वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बार्शी येथे आमदार राजेंद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना तालुका प्रमुख प्रविण काकडे, नागेश अक्कलकोटे, जिवन काकडे, माजी नगरसेवक कसबे, दिनेश नाळे, सचिन चव्हाण, रजणी पाटील युवती सेना प्रमुख व तहसिलदार शेख साहेब गट विकास अधिकारी बिचुकले, तसेच परंडा येथे चेतन बोराडे, मेघराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, पंचायत समितीचे माजी सभापती शंकर इतापे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर जाधव आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया प्रमाणात हजर होते.


 
Top