धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 2 डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडचा वाशिम येथील राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा व भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून संभाजी ब्रिगेड कोणती भूमिका घेणार आणि या मेळाव्यात कशाप्रकारे राजकीय सामाजिक मांडणी होणार हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे अभ्यासू आणि तेवढेच आक्रमक वक्ते जी भूमिका मांडतील त्यामधून महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघेल आणि निश्चितच परिवर्तनाचा संदेश जाईल अशी आशा महाराष्ट्रातील जनता करत आहे.
महाराष्ट्रातील येणाऱ्या कार्यकर्त्यांची निवासाची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे.संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ पदाधिकारी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सूचना करीत आहेत. तरी वाशिम येथे होत असलेल्या या वर्धापन दिनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी, कार्याध्यक्ष मनोज कोळगे, उपाध्यक्ष आकाश मुंडे,राजकुमार देशमुख, मनोज लोमटे, दत्तात्रय कवडे, संदीप लाकाळ, हनुमान हुंबे, समाधान खुळे, दिनेश चौघुले यांनी केले आहे.