धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी ओबीसी समाजाच्या संघर्ष लढ्याला बळ द्यावे,आरक्षणाचे रक्षण व्हावे व शासनाला कष्टकरी,गोरगरीब वंचित ओबीसीच्या न्याय हक्काचा विचार करण्याची सद्बुद्धी द्यावी. राष्ट्रीय ओबीसी महासंघ या देशपातळीवरील सक्रिय संघटनेच्या वतीने ओबीसी बहुजन समाजाचे सामाजिक ऐक्य व आरक्षणाच्या संविधानिक हक्कांच्या विषयावर महाप्रबोधन मेळावा व धाराशिव ते तुळजापुर पदयात्रा आयोजित करण्यात आली.

धाराशिव शहरातील छ.शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण करून आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने  धाराशिव ते तुळजापूर अशी  ओबीसी ऐक्य पदयात्रा काढली.या पदयात्रेच्या निमित्ताने सर्व ओबीसी बांधव ओबीसी मधील सामाजिक आर्थिक शैक्षणिक आदी क्षेत्रा मध्ये अस्वस्थता  निर्माण झालेली आहे.आई तुळजाभवानी चरणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आम्ही आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कडे साकडे घालतले हे आमच्या ओबीसी बांधवां सह सर्व जाती  धर्मातील प्रवर्गातील बांधवांना न्याय  मिळावा,बिहार राज्याच्या धर्तीवर जात निहाय जन गणना व्हावी.शासनाला सदबुद्धी दे जेणेकरून या राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी.महाराष्ट्रातला बंधू भाव कायम रहावा.कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या मान्य करावेत ओबीसीवर मध्ये आज सामाजिक अस्वस्थतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये तोडगा काढत असताना कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये .म्हणून आम्ही या पदयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र  शासनाला विनंती करतो की शासनाने आमच्या संविधानिक मागण्या ज्या जातनिहाय जनगणना असो, ओबीसी आरक्षण  असो. पदोन्नतीतील आरक्षण असो राजकीय आरक्षण असो शैक्षणिक आरक्षण असो सामाजिक आरक्षण असो या सर्व बाबींमध्ये शासनाने सर्व प्रवर्गाचा सर्व जाती धर्माचा विचार करून राज्यांमध्ये निर्माण झालेली अशांततेची परिस्थिती या ठिकाणी ताबडतोब निर्णय घेऊन यावर मार्ग काढावा यासाठी बबनराव तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव ते तुळजापूर अशी पदयात्रा काढून आई तुळजाभवानीला साकडं घालत आहोत. या पदयात्रेमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पांचाळ ,युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष  दिपक जाधव, धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले, मराठवाडा उपाध्यक्ष लक्ष्मण माने,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,धनंजय राऊत,वैजिनाथ गुळवे,महाराष्ट्र जिल्हा लातूर युवा अध्यक्ष दिलीप पिनाटे,आदी सह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.


 
Top