परंडा (प्रतिनिधी) - मागील भांडणाची कुरापत काढून तरूणावर सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली. बाबासाहेब पालके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परंडा शहरातील भीमनगर भागात रविवारी संध्याकाळी बाबासाहेब पालके याने मागील भांडणाची कुरापत काढून अजय चौतमहाल याच्यावर सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सदरील तरूण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.


 
Top