परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील ढगपिंपरी येथील तरुण शौकत चॉंद शेख यांची राज्य राखीव पोलीस दल गट नं.5 मध्ये निवड झाल्याबद्दल ढगपिंपरी ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला

यावेळी सरपंच गुंफाताई लहु मासाळ, ग्रामसेवक आर.एस भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र परबत, रामराजे काकडे, सिंधुताई येवारे, मा. सरपंच बप्पाजी जाधव,ल हु मासाळ, गजानन वाघमारे, सुरेश येवारे, नितीन गरड, बालाजी खर्चे, दादासाहेब पाटील, भर्तरी वाघमोडे, शेख हुसेन शेख, बाजीराव हिवरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

जिद्द आणि चिकाटी कोणत्याही परिस्थितीला हरवते अशीच कथा आहे. शौकत शेख या तरुणाची जी कोणालाही लाजवेल आणि कष्ट करण्यास प्रेरणा देईल. दौडं राज्य राखीव पोलीस दल गट नंबर 5 चा रिर्जट आला आणि या तरुणाचा जिद्दिचा आणि संयमचा प्रवास संपला. काल त्याची निवड झाली आणि सगळ्या गावातील लोकांना त्याच कौतुक केले आहे. शौकत हा 10 वीत  असताना वडिलांचे छत्र गेलं. त्याच वेळी आईला ही कॅन्सर आहे असे समजले 2017 पासून घरचे सगळ काम करून आई च्या हॉस्पिटलचा सगळा खर्च सांभाळून बार्शीत कामगार चौकात जाऊन काम केल. स्वतः चा सगळा खर्च आणि बार्शीला तयारी करत असताना सगळा खर्च त्याने स्वतः केला आहे. सगळं करत असताना गावातील त्याचा मित्र अतुल परबत जो आर्मी मध्ये भरती झालेल्या त्याचे पण मोलाचं सहकार्य त्याला लाभले. त्याच बरोबर गावातील डॉ.नानासाहेब गरड तसेच बार्शीत अभ्यास करत असताना गजानन वाघमारे सर यांचे ही सहकार्य व मार्गदर्शन त्याला मिळाले. त्याच अभिनंदन करण्यासाठी हा सत्कार समारंभ नसून त्याची जिद्दी व चिकाटीचा प्रवास होता. असे ग्रामस्थाकडून सत्कार करताना व्यक्त केला आहे.


 
Top