धाराशिव / प्रतिनिधी-

 येथील नवनाथ सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने बोंबले हनुमान मंदिर परिसरामध्ये असलेल्या श्री संत नामदेव महाराज मंदिराशेजारी श्री संत नामदेव महाराज संगीत विद्यालयाचे उद्घाटन हभप रामचंद्र बचाटे महाराज यांच्या हस्ते दि.१६ एप्रिल रोजी करण्यात आले.

वारकरी संप्रदाय वाढावा यासाठी लहान मुलांना पेटी, तबला, टाळ व गायन याचे धडे देता यावेत या उद्देशाने हे विद्यालय सुरू केले आहे. याची उपशाखा उंबरे कोटा परिसरातील देवी मंदिर येथे सुरू करण्यात आली आहे. यावेळी हभप शशिकांत देशमुख, दिपक काकडे, आबा पवार, राम मुंडे, तुकाराम शिंदे, अर्जुन इंगळे, माणिक इंगळे व शिक्षक हभप अविनाश गिरी महाराज आदींसह नागरिक उपस्थित होते. 


 
Top