परंडा /प्रतिनिधी - 

ओएनजीसी आणि स्टीम अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा या स्पर्धेत तालुक्यातील डोमगाव नं.१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पृथ्वीराज हरिश्चंद्र मिस्कीन याने यश मिळवले असून मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. पृथ्वीराज मिस्कीन याला मुख्याध्यापक बाळासाहेब पुजारी व शिक्षीका अर्चना कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले.या निवडीचे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


 
Top