तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील सकल जैन समाज बांधवांच्या वतीने  जैन धर्मायांचे अतिशय पवित्र असे सिद्धक्षेत्र महा पर्वतराज श्री सम्मेद शिखर हे पर्यटन क्षेत्र घोषीत केल्याच्या  झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ गुरुवार दि २२ रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला.

   जैन धर्म २४ तीर्थकर भगवान पैकी २० तिथंकर ज्या पवित्र भूमित मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यातील मधुवन (जिल्हा गिरडोह) येथील महा पर्वतराज श्री सम्मेद  शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. या अनुषंगाने त्या ठिकाणी नॉनव्हेज हॉटेल्स, पत्र, बारव इतर अशा ब-याच मनोरंजक गोष्टी सुरू होतील, जेकि  अहिंसा तत्वाच्या एकदम विरुध्द असणार आहेत. जागतिक पातळीवर जैन समाज हा शांतताप्रिय व अहिंसा तत्वाचा पुजारी आहे. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन २० तिर्थंकर पवित्र मोक्ष  भूमिवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो. परंतु सरकाच्या सदर निर्णयामुळे जैन समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पवित्र भूमिचे पावित्र्य धोक्यात आले असून जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालावयाचा हा प्रयत्न आहे.  तुळजापूर शहर व जिल्ह्यातील विविध सकल जैन मंदिर ट्रस्ट संघटना, युवक व महिला मंडळ, शैक्षणिक संस्था सरकारच्या या निर्णयाचा मोर्चा काढुन निषेध व्यक्त  केला.

 यावेळी चंद्रवदन शेटे पदमराज गडदे वर्धमान व-हाडे सतिश शेटे शेखर व-हाडे योगेश शेटे सिध्दप्पा शेटकर आयसी पाटील सिध्दांत मेहता भामंडल मेहता प्रविण कासार अनिल सोलापूरे विलास रोकडे नितीन कासार प्रेमचंद रोकडे रविकिरण दुरुगकर सुभाष शेटे जयश्री कंदलेअदिसह मोठ्या संखेने समाज बांधव उपस्थितीत होते

 
Top