उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील  इंन्डो वेस्टर्न म्युझिक कला अकादमी चे संचालक संगीतकार प्रभाकर जगदाळे हे आकाशवाणीच्या सेंट्रल ऑडिशन बोर्ड दिल्लीच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदुस्थानी लाईट अँड फोक म्युझिक ची ऑडिशन टेस्ट उत्तीर्ण झाले असून त्यांना म्युझिक कंपोझर विभागात 'बी' ग्रेड मिळाला आहे.

प्रभाकर जगदाळे हे मागील पंचेचाळीस वर्षांपासून संगीत क्षेत्राशी संबधीत असून  ऑर्केस्ट्रा महाराष्ट्र म्युझिक क्लब, कुमार ऑर्केस्ट्रा, यादे पुराणी,ऑर्केस्ट्रा बॉर्न स्टार्स  अशा विविध बॅनर च्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देऊन संगीतक्षेत्रात भरीव असे काम केले आहे.

सोबतच त्यांनी अनेक गीतकारांची गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्या गीतांच्या तुळजापूरची जत्रा,माता तुळजाभवानी, 

प्रीतीचा बंगला बांधीन मी चंद्रा, तुळजाभवानी अमृतवाणी,आईचा छबीना ई. सी.डी.व कॅसेट्स प्रसिद्ध झाल्या आहेत. सत्यसावित्री,ओटी जगदंबेची या दोन चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले असून श्रीकांत नारायण,अमेय दाते

त्यागराज खाडीलकर,विवेक नाईक,शकुंतला जाधव,अंजली नांदगावकर, संचिता मोरजकर,जगदीश गोरसे, शशिकांत मुंबरे अशा नामवंत गायक, गायिकांनी ही गाणी गायिली आहेत.

  आकाशवाणीची म्युझिक कंपोझरची  परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे जगदाळे आता आकाशवाणी चे मान्यताप्राप्त संगीतकार झाले आहेत. जगदाळे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल संगीत आणि साहित्य क्षेत्रातील अनेक जाणकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top