उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील किंग्ज कॉर्नर ते छत्रपती शाहू महाराज चौक यादरम्यान हायवे लगत असलेल्या सर्विस रोडवर सर्वांनीच अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१४ डिसेंबर रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे. 

उस्मानाबाद शहरातील छत्रपती रमाई नगर, मिलिंद नगर, शालिमार हॉटेल, महाडा कॉलनी व एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी सर्व्हिस रोड आयआरबी कंपनीने तयार केलेला आहे. परंतू या भागातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी सोय केलेली नाही. या भागात जवळपास ५ ते ६ हजार नागरिक असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सायकलवर येताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र व रोटरी नेत्रालय असल्यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणात धोका वाढलेली आहे. तर डाव्या बाजूने महा वितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनी जमिनीखालून गेलेल्या धो देखील त्या विद्युत वाहिनीवर बांधकाम केलेले आहे त्यामुळे नागरिकांना रस्त्यांनी चालताना कसरत करावी लागत आहे.  मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंता व आरबीआय कंपनीचे अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी जिल्हा संघटक मंगलताई आवाड, कोषाध्यक्ष विद्याताई वाघमारे, सुरेखा गंगावणे, लक्ष्मीबाई गायकवाड, सुमन वाघमारे, लोचना भालेराव, सविता कांबळे, संगीता वाघमारे, मनीषा शिनगारे, मंगल आवाड, शारदा वाघमारे, अर्पिता कांबळे,‌ शारदा वाघमारे, रसिका झेंडे, सिंधू वाघमारे, मनीषा रणशृंगारे आदी महिलांसह पुरुषांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

 
Top