तेर/ प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शिवछत्रपती तालीम संघाच्या पैलवानांनी जिल्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत व तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वजनी गटात उल्लेखनीय कामगिरी करून जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत आदित्य भक्ते ४५ किलो वजनी गटात द्वितीय , अभिषेक माने ६७ किलो वजनी गटात द्वितीय , मनोज कोळेकर ६१ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला त्याचबरोबर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुमित खांडेकर , आदित्य भक्ते , अभिषेक माने , पृथ्वीराज पुजारी , श्रीनिवास हेगडकर , अभिजित रपकाळ , आयान शेख यांनी विविध वजनी गटात अनुक्रमे द्वितीय क्रमांक पटकाविल्याा बदल ग्रामस्थांच्या वतीने यश संपादन करणाऱ्या पैलवानांचा सत्कार करण्यात आला .दरम्यान या यशस्वी पैलवानांना शिवछत्रपती तालीम संघाचे अध्यक्ष नानासाहेब भक्ते , शामराव गायके , नवनाथ पसारे , संजय जाधव , राजेंद्र पसारे , आदिचे मार्गदर्शन लाभले .यावेळी पैलवान भागवत भक्ते , सरपंच नवनाथ नाईकवाडी , तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष जुनेद मोमीन , पत्रकार नरहरी बडवे , इर्शाद मुलांनी आदि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी , नंदू माने , नारायण साळुंके , हरी भक्ते , कादर शेख , आदिंसह पैलवान, पालक उपस्थित होते.