उस्मानाबाद / प्रतिनिधी
लिंगायत समनव्य समितीच्या वतीने मुंबई येथे २९ जानेवारी रोजी आंदोलन होणार आहे.त्यानिमित्त उस्मानाबाद येथे झालेल्या नियोजन बैठकीत आंदोलनाची तयारी बाबत बैठक झाली.या बैठकीत लिंगायत समनव्य समितीच्या उस्मानाबाद शहर समनव्यक पदी लिंगायत तेली समाज धाराशिव संघटनेचे रवि कोरे आळणीकर यांची निवड करण्यात आली.निवडी निमित्त खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सत्कार केला.