उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहेत.आजपासून आचारसंहिता लागू झाली असून , 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू पी एस मदान यांनी   केली.

 ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.20 डिसेंबरला मतमोजणी नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल . नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल,मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल, असे मदान यांनी सांगितले ,

 उस्मानाबाद जिल्ह्यातील 166 ग्रामपंचायत च्या निवडणुका होणार आहे यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 2, कळंब तालुक्यातील 30, लोहारा तालुक्यातील 13, उस्मानाबाद तालुक्यातील 45, परंडा तालुक्यातील 1, तुळजापूर तालुक्यातील 48, उमरगा तालुक्यातील 23 तर वाशी तालुक्यातील 4 ग्रामपंचायतचे निवडणुका 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे व निकाल 20 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होणार आहे.

 
Top