उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  आणि युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे  ांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वास मान्य करुन उस्मानाबाद  शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील व माजी नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

  शहरातील सरफराज उर्फ नविद काझी यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जिशान काझी, शाहबाज पठाण, सुलतान नाईकवाडी, जमशेर पठाण, जाकेर शेख, जावेद बेग, शाहाबाज कुरेशी, आतिक शेख, सदाम शेख, रेहान शेख, परवेज मोमीन, तोफिक शेख, आमेर तांबोळा, शहानुर मोमीन, समीर सय्यद, सहेबाज शेख, फसी काझी, बिलाल काझी, अनवर पठाण, यशवंत चव्हाण, खलील सौदागर, निहाल मुलानी, साजीद शेख, नुर बागवान, मजहर पठाण, जाकीर मोमीन, रफिक बागवान, आय्युब बागवान, ताहेर बागवान, निजाम शेख, अजहर बागवान, बहु शेख, हैदर शेख, मुन्ना तांबोळी, रामा पेठे, सतिश पेठे, महेश पेठे, नुर तांबोळी, वहीम तांबोळी, दादा नवले, बबलु बागवान, जलील शेख, उमर बागवान, मेघराज शेटे, राजू शेख, फरदीन शेख, खंडु देडे, इस्माईल शेख, सनीत पेठे, इम्रान पठाण, आमीर पठाण, राहेशा पठाण, मोहसीन पठाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या हाती जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील आणि नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदु राजेनिंबाळकर यांनी  शिवबंधन बांधून यापुढील सामाजीक आणि राजकीय वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.

   याप्रसंगी पंकज पाटील, मुजीब काझी, अफरोज पिरजादे, कलीम कुरेशी, गफुर शेख, बापु साळुंके, छोटा साजीद यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे पदाधीकारी उपस्थित होते.

 
Top