परंडा / प्रतिनिधी - 

तालुक्यातील अनाळा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था ,उस्मानाबाद व गोट ट्रस्ट लखनऊ यांच्या वतीने चार दिवशीय पशुसखी  निवासी प्रशिक्षण संपन्न झाले.अनाळा येथील औसरे हॉल मध्ये पशुसखी प्रशिक्षण दि.६ सप्टेबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आले. 

या प्रशिक्षणात महिलांना शेळी पालन याविषयी माहिती देऊन शेळ्यांना होणारे आजार , शेळीचे लसीकरण , पिल्लांची वजन वाढीसाठी करायचे नियोजन , उच्च प्रतिचे पशु खाद्य मिश्रण कसे तयार करायचे , विविध औषधी वनस्पती पासून खोबरेल तेल मिश्रण करून नीम ऑईल तयार करणे ‘ , मसालेदार पदार्थापासून मसाला बोलस तयार करणे यांचे प्रात्यक्षिक पशुसखी प्रशिक्षणात गोट ट्रस्ट चे समन्वयक शिवाजी राऊत  , सी.एल. एम.अजय हराळे यांनी महिलांना कृती द्वारे दाखवले . या प्रशिक्षणाचा शेळी पालकांना मोठा फायदा होणार असून उत्पन्नात मोठी वाढ होऊन आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होणार आहे. गोट ट्रस्ट चे जिल्हा समन्वयक शिवाजी राऊत यांनी चार दिवशीय पशुसखी प्रशिक्षणात  शेळीपालनाविषयी अनमोल मार्गदर्शन केले. या रिफ्रेशर पशुसखी प्रशिक्षणामुळे गावातील शेळ्यावर प्रथम उपचार करण्यास फार मोठी होणार आहे . पशुसखी प्रशिक्षण  स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे उपमन्यू पाटील , जिल्हा समन्वयक किरण माने , सहाय्यक समन्वियिका सीमा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या चार दिवशीय पशुसखी प्रशिक्षणासाठी तालुक्यातील अनाळा , रोहकल, कारला, पिस्तमवाडी , साकत [ खु ] ,साकत [ बु ] पिंपरखेड , देवगांव [ बु ] , मुगांव, ताकमोडवाडी , , चिंचपुर [ खु ] मलकापूर , रत्नापूर , इनगोदा गावातील प्रत्येकी एक पशुसखी महिला सहभागी झाली होती . या प्रशिक्षणात काही पशुसखी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले . प्रशिक्षण यशस्वीतेसाठी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयक नौशाद शेख ,गट समन्वयक अनिता ठोसर ,रेणुका सुर्वे यांनी अथक परिश्रम घेतले.

जिल्हा समन्वयक गोट ट्रस्ट उस्मानाबाद चे शिवाजी राऊत यांची प्रतिक्रिया- स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था , उस्मानाबाद व गोट ट्रस्ट लखनऊ यांच्या वतीने तालुक्यात दुसऱ्यांदा पशुसखी प्रशिक्षण घेण्यात आल्याने गावपातळीवर शेळ्यांवर उपचार करताना गावस्तरावतील पशु सखींना मोठी मदत होणार आहे.पशुसखी गावातील शेळ्यांना लसीकरण , डिवर्मीग करत असल्याने पावसाळ्यात शेळ्यांना होणाऱ्या आजारा पासून बचाव होणार आहे.


 
Top