उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सन 2004 मध्ये ग्रामीण भागातून उस्मानाबाद मध्ये येऊन समर्थनगर मध्ये आम्ही छोटी सुरुवात केली, आज आपण या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहत आहोत, आज 300 कोटी ठेवींच्या पुढे भरारी घेतली आहे, ती फक्त स्वच्छ हेतूने काम करत राहिल्यानेच,असे  रूपामाता उद्योगसमूहाचे संस्थापक चेअरमन अ‍ॅड.व्यंकटराव गुंड  यांनी सांगितले.

 रुपामाता मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या 11 व्या तसेच रूपामाता अर्बन क्रेडिट सोसायटीच्या 19 व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.आज सहकार क्षेत्रात कितीतरी संस्था  तोट्यात आहेत, पण रुपामातावर असलेल्या खातेदारांच्या विश्वासामुळे आपण प्रगती करत आहोत, महिलांसाठी आम्ही आकर्षक व्याजदराच्या योजना आणल्या. त्यामुळे महिला आत्मनिर्भर बनत आहेत. तरुणांना रोजगार मिळावा, शेतकरी सावकारी पाशातून मुक्त व्हावा या हेतूने आम्ही रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून काम करत आहोत. रुपामाता उद्योग समूह, बँकिंग, दुग्धव्यवसाय, रुपामाता नॅचरल शुगर्स,पाडोळी, रुपामाता पावर, माजलगाव, मनोरमा मनोरमा नॅचरल शुगर्स, देवसिंगा या माध्यमांतून हजारो तरूणांना थेट, तसेंच 1 लाख पेक्षा लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार देत आहे. असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी रुपामताकडे 9500 मेट्रिक टन क्षमतेचे वेअर् हाऊस आहे, मालाला चांगला भाव मिळेपर्यंत आपण आपला माल वेअर हाऊसमध्ये ठेऊन चांगला भाव आल्यावर तो विकावा असे त्यांनी सांगितले.

 सहकार बोर्डाचे श्री.मधुकर जाधव यांनी रुपामाताच्या आर्थिक परिसथितीचा आढावा घेतला. संस्थेच्या 2021-22 य आर्थिक वर्षाच्या अहवालाचे वाचन श्री.गुंड यांनी केले. श्री.पुजारी व श्रीअ‍ॅड. मिनीयार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेस शुभेच्छा दिल्या. मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय व्यवसाय करणाऱ्या रुपामाता अर्बन च्या लोहारा व तुळजापूर तसेच मल्टिस्टेटच्या औसा, नळदुर्ग व उस्मानाबाद शाखांना सन्मानित करण्यात आले. 

 रूपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बोधले यांनी आगामी काळात रुपामता अर्बनच्या शाखांना सोलापूर, अहमदनगर, लातूर या जिल्ह्यामध्ये परवानगी मिळाली असून, जळकोट, डाळींब, ढोकी या शाखा लवकरच सुरू करण्याचे जाहीर केले. रुपामाता मल्टिस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मिलिंद खांडेकर यांनी प्रास्ताविक केले.  दत्तात्रय सोनटक्के,  सुधाकर गुंड गुरुजी, बाबुराव पुजारी,  शंकर गाडे, मनोहर सुर्यवंशी, विजयकुमार खडके व्यासपीठावर हजर होते.  गीरथ जोशी,अ‍ॅड. शरद गुंड,अ‍ॅड.  मिणीयार, श्री.बोधले, श्री. खांडेकर, श्री.संदीपान गुंड, सर्व संचालक, ठेवीदार, कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.


 
Top