उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   साहित्यिक तथा नगरपालिकेचे माजी गटनेते युवराज नळे यांना त्यांच्या मानवतावादी समाजकार्याची नोंद घेऊन लघुउद्योग भारती तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त “सामाजिक कार्य पुरस्कार “ देऊन गौरविण्यात आले. 

जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री.जावळीकर, एम.आय.डी.सी.चे श्री. धनंजय कुलकर्णी, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निशांत होनमुटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी उद्योजक संतोष शेटे, प्रविण काळे, संजय देशमाने,पदमशेठ अजमेरा, रमेश सारडा, मदन पवार, संभूदेव खटिंग, एन.डी गाडे, हेमंत इंदापूरकर, विकास बेलुरे, प्रताप अडसूळ इत्यादींची उपस्थिती होती.


 
Top