उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सकाळ माध्यम समूहाच्या वतीने यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत केंद्रीय रोजगार समितीच्या संघटक सदस्य म्हणून श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील बी.कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी योगेश पांचाळ यांची राज्यातून  ऑनलाईन परीक्षा, कार्याचा अहवाल, मुलाखत या गुणवत्तेच्या निकषावर त्यांची  निवड करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील आकुर्डी परिसरातील एस. बी. कॉलेज मधील एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले. सामाजिक व पत्रकारितेच्या कार्यात सदैव तत्पर असलेले, कोणताही राजकीय वारसा नसताना निवडणुकीतून उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष ते २०२१ मध्ये शॅडो मंत्रिमंडळात सहभाग आणि आता केंद्रीय रोजगार समितीच्या संघटक सदस्य पदी नियुक्ती हे यश त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर खेचून आणले आहे. या त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालय व राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते योगेश पांचाळ यांचा शाल व हार घालून  सत्कार शनिवार (ता.६) रोजी करण्यात आला. यावेळी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रविण गायकवाड, डॉ. सायबण्णा घोडके,  काकासाहेब पाटील, डॉ. राजेंद्र गणापूरे, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. शिला स्वामी, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. सुजित मटकरी, डॉ. सोमनाथ बिरादार, डॉ. रमेश आडे, लालअहमद जेवळे, दिलीप घाटे, चंद्रकांत पुजारी आदींसह यिनच्या स्थानिक कार्यकारिणीचे सचिव शुंभागी कुलकर्णी, सहसचिव गायत्री खंडेलवाल, कोषाध्यक्ष पुजा शिंदे, सदस्या निकिता पाताळे, संपर्क प्रमुख अमोल कटके आदींसह विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी यिनचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. महादेव कलशेट्टी यांनी मानले.

 
Top