भूम/ प्रतिनिधी-

 महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री   प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी भूम शहरात धावती भेट दिली असता पत्रकारांना संबंधित करताना प्रश्नाला उत्तर देताना भूम शहरासाठी भव्य दिव्य रुग्णालय उभारण्याची निश्चित प्रयत्न करू असे  आश्वासन मंत्री तानाजी सावंत यांनी दिले

शिंदे सरकार स्थापन होऊन कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले भूम परंडा वाशीचे आमदार माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी नियोजित दौरा भूम परांडा वाशी तालुका साठी ठेवला असता याप्रसंगी मंत्री पदाची घोषणा होऊन खातेवाटप झाले नसल्याने ते उस्मानाबाद येथे ध्वजारोहणासाठी निघाले असता भूम शहराला भेट देण्यासाठी आले व भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी थांबले असता पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांनी नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांना आपण महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री झाला आहात आपणाला भूमकरांकडून खूप खूप शुभेच्छा असे सांगत भूमकरांची खूप दिवसापासून ची प्रतीक्षा आहे की भूम शहराला तालुक्याला मोठे असं रुग्णालय नसल्याने लोकांची खूप गैरसोय होत असल्याने आपण आता आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे झाले असल्याने आपण भूमकरांची या मागणील कितपत पूर्ण करणार असे विचारले असता मी निश्चित भूमकरांच्या या गैरसोयी साठी भव्य असे हॉस्पिटल रुग्णालय उभारण्याचं निश्चितपणे प्रयत्न करेल असे आश्वासन व शब्द नामदार प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी दिले

 याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ संयोगिता गाढवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,  जिल्हा परिषद सदस्य दत्ता  साळुंखे, अण्णासाहेब देशमुख , बालाजी गुंजाळ, साहिल गाढवे, सुरज गाढवे बालाजी अंधारे, मुशीर शेख, अॅड.पोपटराव गाढवे, किरण जाधव, वस्ताद  जमादार आदीी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top