लोहारा/प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने लोहारा तहसील कार्यालयाच्या सभागृहात विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत लाभ देण्यासाठी दि.10 ऑगस्ट 2022 रोजी एकदिवसीय विशेष शिबिर कॅंप घेण्यात आला. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 

शिधापत्रिका धारकांनी आपल्या कुटुंबातील मयत व्यक्ती, विवाह नंतर स्थलांतरीत व्यक्ती, कामानिमित्त ईतर ठिकाणी स्थलांतरीत झालेल्यांनी अर्ज करुन आपले नांवे कमी करुन घ्यावेत, असे आवाहन तहसिलदार संतोष रुईकर यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार माधव जाधव, अव्वल कारकून यु.ई.मुदीराज, बालाजी सगर, बस्वराज वाळके, लिपीक देवगिरे, कोतवाल अभिजीत गायकवाड, आनंद राठोड आदी उपस्थित होते.  या शिबिरात वंचित असलेल्यांना शासनाच्या विविध योजनेतून लाभ देण्यात आला. या शिबिरास लोहारा शहरातुन व ग्रामीण भागातुन महिला, वृध्द व्यक्ती, एकल महिला, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 
Top