वाशी/ प्रतिनिधी-

 भारतीय कृषी विमा कंपनी यांच्यामार्फत शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना जनजागृतीसाठी मोबाईल व्हॅन सुरू करण्यात आली व  वाशी   तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा यासाठी पुढील काही दिवस चित्ररथ संपूर्ण वाशी तालुक्यात भ्रमण करतील व शेतकऱ्यांमध्ये योजनेबद्दल जनजागृती करून लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांनी पीक विमा योजने मध्ये सहभाग घ्यावा यासंबंधी प्रचार प्रसिद्धी करेल. सदरील चित्रारथ विमोचन  उपविभागीय कृषि अधिकारी श्री शुक्राचार्य भोसले  यांच्या हस्ते करण्यात आले#

यावेळी वाशी तालुका कृषी अधिकारी श्री संतोष कोयले व कळंब तालुका कृषि अधिकारी  बी .बी .जाधव सांख्यिकी अधिकारी बंडू कोकाटे , कृषी अधिकारी गणपतराव कदम, कृषी मडंलअधिकारी एस. व्ही. चव्हाण , श्याम खंडागळे ,कृषि पर्यवेक्षक नितीन विश्वेकर, नानासाहेब साखरे , संभाजी जाधव , जयराम गोले,  बालाजी आटोळे , सचिन पवार व, कृषि सहाय्यक , सुषमा यादव, फुंडे , खरसाडे , सलमा तांबोली,  बाळासाहेब डोईफोडे , उमेश अडसूळ , बी सी भुरे , नितीन चौधरी , अतुल पाटील , भाऊसाहेब खाडे,   आदी सह  भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका  समन्वयक रामेश्वर सुरवसे व अच्युतराव ढेंगळे आणि शेतकरी वर्ग उपस्थित होते. 


 
Top