उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसुचित जातीच्या विशेष घटक योजनेत वयक्तिक लाभाच्या विविध योजनीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे . यात  अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी पिठाची गिरणीचा पुरवठा करण्यात येणार आहे  . यात  पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर  करण्यात येईल . अनुसूचित जाती  प्रवर्गातील महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिनचा पुरवठा करण्यात येणार असून .   पात्र  लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी मिनी दाल मील पुरवठा  करण्यात येणार असून   पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे.

  जिल्हा परिषद स्वंसपादीत उत्पन्नातील योजनेअंतर्गत सर्वसाधारण मुलीं, महिलांना एम.एस.सी.आय.टी.(MSCIT)  प्रशिक्षण  देण्यात येणार असून  पात्र लाभार्थ्याना   90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर  करण्यात येणार आहे .         पाचवी ते बारावीपर्यत शिक्षण घेत असलेल्या सर्वसाधारण संवर्गातील  मुलींना सायकल देण्यात येणार आहेत .यात  पात्र लाभार्थ्याना  90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर  करण्यात येईल .

  या योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज तालुकास्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) आणि गावपातळीवर अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधून दि. 17 ऑगस्ट 2022 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयास अर्ज सादर करण्याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) बी.एच. निपाणीकर यांनी  कळविले आहे.

 
Top