उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राष्ट्रवादीच्या वतीने एकतास राष्ट्रवादीसाठी हे अभियान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राबविण्यात येते. त्यानुसार शनिवारी (दि.4) हे अभियान कळंब तालुक्यातील गौर येथे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या वतीने राबविण्यात आले. त्यास शेतकर्‍यांसह तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी दुधगावकर यांनी पक्षाने केलेल्या विकास कामाची माहिती दिली.

हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे कळंब तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी ग्रा.पं.सदस्य जनार्धन लंगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमास वाघोलीचे नेते औदुंबर धोंगडे, भोसा येथील माजी उपसरपंच जाकीरभाई पटेल, जिक्राईल पटेल, वाहेद पटेल, रशीद पटेल, अख्तार पटेल, गौरचे ग्रा.पं सदस्य नामादेव गाढवे, अमोल देशमुख, अमोल लंगडे, विजय लंगडे, जयसुनकुमार  लंगडे, अजित माळी, दिपक माळी, गोविंद शेळके, अजय केसरे, सुनिल पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तसेच राष्ट्रवादीने शेतकर्‍यांसाठी व विशेषतः खेडेगावासाठी केलेल्या उपायोजना याबाबत मार्गदर्शन संजय पाटील दुधगावकर यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार अ‍ॅड.सुशिलकुमार लंगडे यांनी केले.

 
Top