वाशी  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील दसमेगाव येथे भारतीय स्टेट बँक शाखा वाशी च्या वतीने  ग्रामपंचायत सभागृहात खरीप हंगाम सन २०२२साल या वर्षा मधे शेतकऱ्यांना कर्जवाटप व नूतनीकरण चा मेळावा बँकेच्या वतिने घेण्यात आला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एस.बी.आय बँकेचे मॅनेजर- सोमनाथ माने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच पोपट मोरे, माजी उपसरपंच - सुंदरा उघडे, माजी उपसरपंच - काकासाहेब मोरे , शाळा व्यवस्थापन समितीचे माझी  अध्यक्ष - विजय मोरे, दामोदर मोरे, माझी सरपंच - रामभाऊ खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी मॅनेजर सोमनाथ माने व नानासाहेब नलवडे बँककर्मचारी यचा शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

या मेळाव्यात दसमेगाव येथील ५० शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण नूतनीकरण करण्यात आले .तर नवीन १० शेतकऱ्याने बँकेकडे कर्ज मागणीचे अर्ज दाखल केले. या वेळी मॅनेजरने सांगितले की ,बँक आपल्या दारी या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नाही व शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून या मेळाव्याचे आपल्या  गावात आयोजन करण्यात आलेले आहे. असे मेळावे तालुक्यातील प्रत्येक गावात घेण्यात येणार आहेत तरी शेतकऱ्याने कर्ज प्रकरणाचा लाभ घ्यावा असे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी ललित खोब्रागडे , व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top