तुळजापूर / प्रतिनिधी- श्रीतुळजाभवानी मातेची  अभिषेक  पुजा आम्ही चालु केली असुन  लवकरच सांयकाळ ची व सिंहासन पुजा चालु करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन आ राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवार रोजी पञकार परिषदेत केले.

श्रीतुळजाभवानी देविंजींस अभिषेक आज रोजी आरंभ करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पञकार परिषदेत प्रथमता देविंजींचे अभिषेक आरंभ केल्या बद्दल आ राणजगजितसिंहजीपाटील यांचे आभार तिन्ही पुजारी मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले 

यावेळी  भाजपा जिल्हाध्यक्ष निती3 .न काळे ,  तुळजापूर विकासप्राधिकरण माजी सदस्य अप्पासाहैब पाटील , नगराध्यक्ष सचिन रोचकरी , पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके , भोपेमंडळ अध्यक्ष अमरराजे कदम , उपाध्य मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो आदी उपस्थितीत होते.

यावेळी पञकारांशी बोलताना आ पाटील पुढे म्हणाले कि श्रीतुळजाभवानी मातेच्या अभिषेक बाबतीत बोलताना म्हणाले कि  जेव्हा केव्हा पुरातत्व विभागाचा अहवाल येईल तेव्हा त्यावर विचार केला जाईल.

श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या धार्मिक सहाय्यकव्यवस्थापक पदाचा तात्पुरता पदभार नायब तहसिलदार यांच्या कडे दिला जाईल प्रशाद योजने बाबतीत  जिल्हाअधिकारी यांना अहवाल मागवली असुन प्रशाद योजनेची प्रक्रिया सुरु झाली असुन १०जुन पर्यत तज्ञसल्लागार नेमला जाणार असल्याचे यावेळी म्हणाले 

श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान असणारे अधिकारी मर्यादीत काळासाठी असतात खरी जबाबदारी आपली असुन या पार्श्वभूमीवर दर महिन्याला तिन्ही पुजारी मंडळा चा पदाधिकारी शी चर्चा करुन समस्या येथेच सोडविण्याचा प्रयत्न केला .पुजारी वृदांना  ओळखपञ देण्याचा विचार  आहे.धर्मदर्शन रांगेतील भाविकांना देवीदर्शन सुलभ घडत नाही या बाबतीत या रांगेतील भाविकांना देविचे  सुलभ दर्शन घडविण्यासाठी आपण प्रशाषणाला उपाययोजना करण्यासाठी  सुचना देवु असे यावेळी म्हणाले 

यावेळी आनंद कंदले विजय शिंगाडे राजेशेखर कदम उपस्थितीत होते

 
Top