उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूरात गर्दीच्या दिवशी अस्तव्यस्त वाहने मंदीरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध लावले जात असल्याने याचा मोठा फटका देवीदर्नशनार्थ येणाऱ्या भाविकांनसह शहरवासियांना बसत आहे.त्यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूरच्या  वाहतुकीला कधी शिस्त लागणार असा प्रश्न विचारला उपस्थित केला जात आहे. 

सध्या मंदीर महाध्दार समोरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वाहने उभे राहत असल्याने महाध्दार समोरुन मंदीराकडे जाताना भाविकांना कसरत करावी लागत आहे. परंतु तिर्थक्षेञी वाहतुकीचे नियोजन नसल्याने  वाहतुक कोंडी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे 

यावर मात करण्यासाठी तिर्थक्षेञ तुळजापूर येथील वाहतूक व्यवस्थेचे चोवीस तास  नियोजन करणे  गरजेचे बनले आहे.


 
Top