उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य सरकारने एफआरपीचे दोन तुकडे केल्याच्या निषेध म्हणून शुक्रवार दि. २५रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जीआरची होळी करण्यात येवुन दहा तास लाईट या मागणीसाठी  खा. राजु शेट्टी यांनी चालु केलेल्या आंदोलनाला पाठींबा दिला. यावेळी दहा तास लाईट द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी  यांना जिल्हाध्यक्ष रविंद्रइंगळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी धनाजी पेंदे, गुरु भोजणे,  प्रदीप जगदाळे, विकास भोजणे, कमलाकर घुगे, राजकुमार पाटील, अरुण कस्तुरे, स्वप्नील गायकवाड,  लक्षमण घुगे आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थितीत होते.

 
Top