परंडा/ प्रतिनिधी 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एक सम्यक सविधान देऊन  भारताच्या लोकशाहीचा पाया मजबूत केला असे विधान शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी केले.

        श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन आयोजित करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.त्यानंतर प्राचार्या दीपा सावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी covid-19 चे पालन करत उपस्थित होते.यावेळी शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा किरण देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ  शहाजी चंदनशिवे , ए क्यू ये सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने ,संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे समन्वयक अनिल जानराव ,कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दिवाने यांच्यासह अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.


 
Top